नगरचा सहकार महर्षी गेला, शंकराव कोल्हे यांचं निधन

अहमदनगर : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. शंकरारराव कोल्हे यांनी सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला. त्यांचा अंत्यवविधी आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे.

कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली. सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली.त्या संधीचे त्यांनी सोनं केलं. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा परसली आहे. सहकारातील महान व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

येत्या 21 मार्चला शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानं कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहावर शोककळा पसरली आहे. शंकरराव कोल्हे यांचे ‘सत्याग्रही शेतकरी’ हे आत्मचरित्र आहे.