Match Fixer: मॅच फिक्सिंग करत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनी अवघ्या देशाची केली नाचक्की!

Match Fixer : भूतकाळात भारतीय क्रिकेटपटूंना मॅच फिक्सिंगच्या आरोपांना सामोरे जावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. या खेळाडूंच्या वर्तनामुळे अवघ्या देशाची नाचक्की झाली होती. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतीयांच्या भावनांना ठेच पोहोचवणाऱ्या खेळाडूंच्या बाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

मोहम्मद अझरुद्दीन: मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे बंदी घालण्यात आलेला तो सर्वात हाय-प्रोफाइल क्रिकेटर होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग घेतल्याबद्दल 2000 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझरुद्दीनवर आजीवन बंदी घातली होती.

अजय जडेजा: आणखी एक भारतीय क्रिकेटर अजय जडेजा याला मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्यामुळे पाच वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले. नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ही बंदी 4 वर्षांपर्यंत कमी केली.

श्रीशांत : 2013 मध्ये, भारतीय वेगवान गोलंदाज श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलासह, इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. बीसीसीआयने श्रीशांतवर क्रिकेटमधून बंदी घातली होती, पण नंतर 2015 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने ही बंदी उठवण्यात आली होती.