‘तलाक नाहीच पण…’ शोएबच्या तिसऱ्या लग्नाआधीच सानिया झालीय वेगळी, वडिलांनी केलं स्पष्ट

Shoaib Malik Third Wedding:- भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झापासून (Sania Mirza) विभक्त झाल्याच्या अफवांदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) लग्न केले आहे. शोएब मलिकने शनिवारी, 20 जानेवारी रोजी सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

शोएब मलिक आणि सना जावेद एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली होती. मलिकने गेल्या वर्षी सनाच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिच्यासोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. शोएब मलिकच नाही तर अभिनेत्री सना जावेदनेही शनिवारी तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. शोएब मलिकचे हे तिसरे लग्न आहे. शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाच्या वडिलांची (Sania Mirza Father) प्रतिक्रिया समोर आली आहे.

सानियाचे वडील इम्रान मिर्झा (Imran Mirza) यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सानियाने खुला पद्धतीने शोएबला घटस्फोट दिला. मुस्लिम महिलांच्या अधिकारांनुसार खुला म्हणजे मुस्लिम महिला तिच्या पतीला स्वतःच घटस्फोट देते.

शोएब आणि सानियाने 2010 मध्ये लग्न केले होते

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. या दोघांचा विवाह पारंपारिक मुस्लिम पद्धतीने झाला होता. दोघांना एक लहान मूलही आहे, त्याचे नाव इझान आहे. इझानचा जन्म 2018 मध्ये झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा