Big Breaking : महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक; टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप

पुणे : टीईटी परीक्षेत गैरप्रकार (Maha TET exam) झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना काल चौकशीला बोलावल होत. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात (Mhada Paper Scam) अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh) याच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. पुणे सायबर च्या कार्यालयांमध्ये ही चौकशीकरुन अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

जी. ए. टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी होती. त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती.

पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे टीईटीचे 50 ओळखपत्र आढळून आले आहेत. याच्याकडे टीईटीच्या ते चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली आहेत. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी झाली होती. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर tet च्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली नाहीये. आता प्रितीश देशमुख याच्या घरी टीईटीची 50 ओळखपत्रे सापडल्याने टीईटी परीक्षेतही घोटाळा झाला का? असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.