मोठी बातमी – या तारखेला होणार दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. दहावी आणि बारावीच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बोर्ड परीक्षा तर रद्द करण्यात आल्या. पण यंदा मात्र परीक्षा होतील. असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आधीच  जाहीर केले होते.

2022 मध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 तर 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा बारावीच्या परीक्षा  14 फेब्रुवारी ते 3 मार्च तर 10 वीच्या  25 फेब्रुवारी ते 14 एप्रिल या दरम्यान होणार आहे. यंदा होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या दरवर्षीप्रमाणे होणार आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.