गोव्यात काँग्रेसला मोठी आघाडी, भाजप करणार ‘अमित शहा मोड’ ऑन ?

पणजी : गोव्याचे राजकारण देशभरात सगळीकडे गाजले असुन, सर्वांचे लक्ष आणि उत्सुकता लागलेला दि. 10 मार्चचा दिवस आज उजाडला आहे. 14 फेब्रुवारीला 8 व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मात्र, त्यानंतर आज 24 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर 301 उमेदवारांच्या भवितव्याचा पेटारा खुलणार आहे. यंदा विधानसभेच्या सर्व 40 ही जागांची मतमोजणी आज गुरुवारी एकाच वेळी सकाळी 8 वाजता होत असून 301 उमेदवारांचे पुढील 5 वर्षांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. आयोगाने केलेल्या तयारीवरून दुपारी 12 पूर्वी निकाल जाहीर होणार असून सत्तेची गणिते स्पष्ट होतील. त्यानंतर सत्ता कोणाकडे याचा फैसला होणार आहे.

गोव्यात सुरकतीच्या कालांनुसार गोव्यात काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली आहे. गोव्यात काँग्रेस २० जागांवर पुढे आहे. तर, भाजप १५ जागांवर पुढे आहे. यामध्ये विशेष बाब तृणमूल काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे. अशात सत्ता स्थापन करण्यासाठी आता गोव्यात पुन्हा एकदा घोडेबाजार होणार का ? याकडे संपूर्ण देशाचं अक्ष लागलं आहे. त्यामुळे भाजपची भिस्त आता पूर्णपणे अमित शहा यांच्या राजकीय चाणाक्षपणावर दिसत आहे.

दरम्यान, गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचे मांडे निकालाआधीच खाणारे, स्वबळाच्या अतिआत्मविश्वासावर वावरणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे एक्झिट पोलनंतर आणि सुरवातीच्या सूर बदलले आहेत. आता सत्ता स्थापनेसाठी आम्ही छोट्या पक्षांना सोबत घेऊ असा सूर येथे भाजप नेते आळवतायत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले. त्यात गोव्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. या अंदाजानंतर भाजप नेत्यांनी आपले सूर बदलल्याचे समोर येतेय.