गृहखाते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलंय का? पुण्यात घडलेल्या प्रकारावर अभिजीत बिचकुले भडकले

नुकताच समस्त भारताने ७७वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. एकीकडे स्वातंत्र्यदिनी ‘भारत माता की जय’ नारेबाजीने देश दुमदुमला असताना पुण्यातील कोंढवा भागात काहींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. याप्रकरणी तपास सुरु असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं. त्यात अकबर नदफ आणि तौकीर या दोन आरोपींचे नाव समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी या प्रकरणावर बोलताना गृहमंत्र्यांचा खडेबोल सुनावले आहेत.

अभिजीत बिचुकले (Abhijit Bichkule) म्हणाले की, ‘पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात अशा प्रकारचे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणे हे मूळीच खपवून घेतलं जाणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं गृहखातं काय करत आहे ते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलंय का? शासनाने त्यांना लेखी पत्र द्यावं त्यानंतर ते स्वत: त्यांचा शोध घेतील आणि त्यांना फासावर लटकवतील.’