त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांचा राजीनामा, भाजपकडून विनोद तावडेंना मोठी जबाबदारी

मुंबई – त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (Tripura Former CM Biplab Kumar Deb) यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य (Governor Satyadev Narayana Arya) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा भाजपाचे प्रमुख माणिक साहा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विराजमान होण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्रिपुरातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे. या सगळ्या घडामोडी वेगाने घडत असताना आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

भाजपने त्रिपुरातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawade) यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भाजपने विप्लव देव यांच्या राजीनाम्यानंतर विनोद तावडे आणि राज्यसभेचे खासदार भूपेंद्र यादव यांना त्रिपुरातील पक्षीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ऑब्जर्व्हर म्हणून नियुक्त केलं आहे.