राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, ‘या’ नेत्याला लागली लॉटरी

मुंबई – राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने (Bjp) वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने माजी मंत्री कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) आणि मोदी सरकारमध्ये विद्यमान मंत्री असलेल्या पियूष गोयल (Piyush Goyal) या दोघांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती, मात्र, तिसऱ्या जागेसाठी अजूनही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, तिसऱ्या जागेसाठीही भाजपने हालचाल सुरू केली होती. विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक (Vinod Tawde, Harshvardhan Patil and Dhananjay Mahadik) यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.