उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकवण्याचे काम करतात – सुजात आंबेडकर

पुणे – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीनं राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणीही सुजात आंबेडकर यांनी केलीय.

सुजात आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकवण्याचे काम करतात. वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार. जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला?

महाविकास आघाडीनं (MVA) पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय, तर संधी आहे राज ठाकरेंवर कारवाई करा. मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी. संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नका, असं वक्तव्यही सुजात आंबेडकर यांनी केलंय.