भाजपने लागोपाठ तीन दिग्गज लोकप्रतिनिधी गमावले; पक्षाची मोठी हानी

Pune: महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत दुख:द बातमी पुढे आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट व सून स्वरदा बापट आणि नात असा परिवार आहे.
दरम्यान, पुणे भाजपवर गेल्या काही महिन्यात दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. सुरुवातीला आमदार लक्ष्मण जगताप मग आमदार मुक्ता टिळक आणि आता खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या तीनही नेत्यांचे गंभीर आजाराने निधन झाले आहे.
एका बाजूला भाजप पुणे जिल्ह्यात ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला दिग्गज नेत्यांच्या निधनाने आता भाजपला पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. निधन झालेले तिन्ही नेते हे प्रचंड जनसंपर्क असणारे नेते होते. या नेत्यांच्या निधनाने कार्यकर्ते ते पोरके झाल्याची भावना व्यक्त करत आहेत.