सौदी अरेबियन व्यक्तीचे वयाच्या ९०व्या वर्षी पाचवे लग्न; म्हणाले, ‘मला आणखी मुलं जन्माला घालायची आहेत’

Saudi Arebia Old Man: सौदी अरेबियात राहणारे 90 वर्षीय नासेर बिन दाहैम बिन वाहक अल मुर्शिदी अल ओतैबी हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. त्यामागचे कारण म्हणजे त्यांचे पाचवे लग्न. त्यांनी अलीकडेच सौदीच्या अफिक प्रांतात त्यांच्या पाचव्या लग्नाचा आनंद साजरा केला. त्यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते लग्नाचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

सौदी अरेबियातील अरेबिया टीव्हीला मुलाखत देताना 90 वर्षीय नासिर बिन दाहैम यांनी लग्नामागचा हेतू सांगितला. त्यांनी इस्लामच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी आणि सहवास वाढविण्यासाठी विवाह केल्याचे सांगितले.

‘मला पुन्हा लग्न करायचे आहे’
मला पुन्हा लग्न करायचे आहे, यातून आराम मिळतो, सांसारिक सुख मिळते आणि तेच माझ्या चांगल्या आरोग्याचे रहस्य आहे. जे तरुण लग्न करण्यास टाळाटाळ करतात, त्यांना मी लग्न करण्याचा आग्रह करतो, असे नासिर बिन दाहैमने हसतमुखाने मुलाखतीत सांगितले.

वयाची पर्वा न करता विवाहाचे फायदे आणि त्यातून मिळणारा आनंद व्यक्त करण्यास अल ओतैबीने संकोच केला नाही. ते म्हणाले की, मी माझ्या हनिमूनबद्दल आनंदी आहे. लग्न हे भौतिक सुखाचे साधन आहे आणि म्हातारपण लग्नाच्या आड येत नाही.

अल मुर्शिदी अल ओतैबी हे 5 मुलांचे वडील आहेत
सौदी अरेबियात राहणारे 90 वर्षांचे नासेर बिन दाहैम बिन वाहक अल मुर्शिदी अल ओतैबी हे 5 मुलांचे वडील आहेत, त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यांनी मुलाखतीदरम्यान आपल्या कुटुंबाबद्दल देखील सांगितले आणि “माझ्या मुलांना आता मुलं आहेत. मला अजूनही इतर मुलं हवी आहेत” असे सांगितले.