‘ड्युटीवर असलेल्या पोलिसाच्या कानशिलात मारणे हेच यशोमती ठाकूर यांचे ‘मोहब्बत का दुकान’ आहे का?’ 

अमरावती – फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारणात लोकांना तत्वज्ञान शिकवणाऱ्या आ. ऍड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसाच्या कानशिलात मारणे आणि कोरोना ने लोक मरत असताना रेमेडिसीविर चोरांना पाठीशी घालणे हेच त्यांचे ‘मोहब्बत का दुकान’ आहे का, असा सवाल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले,  ऍड यशोमती ठाकूर या छद्म धर्मनिरपेक्ष असल्याने ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को जली’ हा वाक्प्रचार त्यांच्यासाठी सार्थ ठरतो. उठसुठ राष्ट्रीय विषयांवर बोलणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या दिव्याखाली अंधार आहे. त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्या एवढया अकार्यक्षम मंत्री अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात झालेल्या नाहीत. इस्लामी दहशतवाद्यांनी पशु वैद्यकीय औषधी व्यवसायी उमेश कोल्हे यांचे प्रकरण दडपण्यासाठी अमरावती पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या याच यशोमती ठाकूर होत्या. आमच्या NIA च्या मागणीनंतर आमच्यावर कारवाई करा असा दबाव टाकणाऱ्या यशोमती ठाकूर होत्या. अमरावती जिल्ह्यातील गठ्ठा मतदानासाठी उमेश कोल्हे यांच्या हत्येला ‘लुटमारी’ चे रूप देण्याचा केविलवाणा प्रयत्न यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्यांचे पक्षश्रेष्ठी आणि एकमेव श्रद्धास्थान असलेल्या राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेले ‘मोहब्बत का दुकान’ म्हणजे हेच का, असा आमचा सवाल आहे.

ते म्हणाले, 12, 13 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावतीत रझा अकादमीने केलेल्या संघटित हिंसाचाराच्या प्रायोजक ऍड. यशोमती ठाकूर होत्या. रझा अकादमीच्या मोर्चाला खुली सूट देण्यासाठी अमरावती पोलिसांवर यशोमती ठाकूर यांचाच दबाव होता. संघटित गुन्हेगारांनी अमरावतीत उच्छाद मांडला तेव्हा यशोमती ठाकूर यांनी तोंडात मूग गिळले होते. शेकडो हिंदूंची दुकाने तोडल्यावर त्यांचे सांत्वन न करता ‘काकीजान, अम्मीजान, अब्बाजान’ करत फिरणाऱ्या यशोमती ठाकूर यांचे ‘मोहब्बत का दुकान’ अमरावतीकरांना चांगले ठाऊक आहे. अमरावतीतल्या जातीय तणावानंतर मन न भरलेल्या यशोमती ठाकूर यांनी अचलपूर मध्ये देखील अमरावतीची पुनरावृत्ती घडवण्याचा प्रयत्न केल्याचे अमरावती जिल्ह्याला चांगले ठाऊक आहे.

ते म्हणाले, कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना रेमेडिसिव्हीर चोरांच्या पाठीशी याच यशोमती ठाकूर उभ्या होत्या. कोरोना काळात भारतालाच नव्हे तर जगाला साहाय्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विरोधात रोज पाढा वाचण्यापेक्षा आणि अपप्रचार करण्यापेक्षा काँग्रेसने आजवर केलेल्या पापाची उत्तरे आपल्याला द्यावी लागणार आहेत. चीनच्या सीमेवर सैनिक लढत असताना रात्रीच्या अंधारात राहुल गांधी चिनी राजदूतांशी खलबते करतात. देशाच्या बाहेर जाऊन भारताची प्रतिमा मलिन करतात. लक्षावधी शिखांचे शिरकाण हीच तुमची मोहब्बत होती का ? गोरक्षेसाठी आंदोलन करणाऱ्या साधुसंतांना चिरडणे, पालघरात तुमच्याच लोकांनी दोन साधूंचा निर्घृण खून करणे, आणीबाणीत लक्षावधी निरपराधांना तुरुंगात डांबणे, हेच तुमचे मोहब्बत दुकान आहे का ? आपल्या पंधरा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा जबाब यशोमती ठाकूर यांना जनतेला द्यावा लागणार आहे. यशोमती ठाकूर यांना आम्ही सांगू इच्छितो, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. त्यांनी मोझरी विकास आराखड्यापासून ते कौंडण्यपूर आराखड्यापर्यन्त यशोमती ठाकूर यांच्या कथित विकासाचे मॉडेल कसे आहे, हे पुराव्यानिशी आम्ही बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी जयंत डेहनकर, किरण पातूरकर, प्रा. रवींद्र खांडेकर, तुषार भारतीय, राजेश वानखडे, चेतन गावंडे, मंगेश खोंडे, सचिन रासणे, बादल कुळकर्णी, प्रशांत शेगोकर आदी मान्यवर उपस्थित होते .