वंचित बहूजन आघाडी पुणे शहर यांच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा निषेध

पुणे – मणिपूर हिंसाचार प्रकरणी (Manipur Violence) केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात पुणे येथील महात्मा फुले मंडई येथे काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मंडई परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलकांनी मोदींच्या (Narendra Modi) विरोधात घोषणांनी पुर्ण परिसर दणाणून सोडला.

मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कालपासून शहरातील पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची धरपकड सुरू होती. कार्यकर्ते आंदोलन ठिकाणी पोहचु नये म्हणून अटकसत्र सुरू होते. तरीही कार्यकर्त आंदोलन ठिकाणी पोहोचले.

यावेळी वंचित बहूजन आघाडी पुणे जेष्ठ नेते वसंत  साळवे, शहर अध्यक्ष मुन्नवर भाई कुरेशी, नागेश भोसले, परेश सिरसंगे, सुनिल धेंडे, दिपक ओव्हाळ, जाॅर्ज मदनकर, विकास भेगडे, अजय भालशंकर, विनोद जाधव, रफिक शेख, सारिकाताई फडतरे, रेखाताई चौरे, प्रतिमा कांबळे, प्रतिभा कांबळे, रंजना कांबळे, ओंकार कांबळे, रितेश गायकवाड, अभिजित बनसोडे, नवनीत अहिरे, बाबासाहेब वाघमारे, जितेश सरोदे, पितांबर धिवार,स्वप्नील वाघमारे, बि पी सावळे सर, किरण कदम, शुभम चव्हाण, , मुक्तेश्वर माने, विवेक लोंढे, सागर भालेराव,  बाळासाहेब बनसोडे, , मिलिंद सरोदे, परशुराम बनसोडे, कोमल शेलार, अरुण इंगळे, योगेश सुरवसे, हरि वाघमारे, शालिनी फडके, साथिका गायकवाड, मेघराज गवारे, विश्वास गदादे, परमेश्वर सनादे, तौफिक शेख, बबन धिवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.