बास्केटबॉल, गरबा डान्सनंतर भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आता क्रिकेट खेळताना दिसल्या

भोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. . प्रकृतीच्या कारणास्तव त्या जामिनावर बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये त्या चक्क क्रिकेट खेळताना दिसत आहेत.  हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील भोपाळमधील आहे.

सुमारे एक मिनिटाच्या व्हिडीओमध्ये भोपाळच्या शक्तीनगर भागातील क्रिकेट मैदानावर भगवे कपडे घालून त्या बॅट हातात घेत फलंदाजीचा आनंद लुटताना दिसत आहेत. एक व्यक्ती गोलंदाजी करताना दिसत आहे. खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर बॅटने अगदी सहज चेंडू मारत आहेत. त्याचवेळी तिथे उभे असलेले लोक टाळ्या वाजवताना आणि जल्लोष करताना दिसतात.

नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजप खासदार आजारी असल्याचे जरासेही दिसत नसल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या सेलिब्रेशनमध्ये त्या गरबा डान्स करताना दिसल्या होत्या. याशिवाय खेळाडूंसोबत बास्केटबॉल आणि कबड्डीचा आनंद लुटताना देखील त्या दिसल्या होत्या.

दरम्यान, प्रज्ञा ठाकूर या  2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे, ज्यात 10 लोक मारले गेले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 2017 मध्ये त्याला जामीन मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भोपाळमधून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा 3.6 लाखांहून अधिक मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे.