‘नंदीबैलाला जरी विचारलं की उद्धवजी घरातून बाहेर पडतील का? तर तो देखील नाही असंच म्हणेल’

Uddhav Thackeray – ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. नंदीबैलाला जरी विचारलं की भाजप सत्तेत येणार आहे का तर तोदेखील नाही असंच म्हणेल असाही टोला ठाकरेंनी लगावला. महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे सेवेकऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पारंपरिक वेशात आलेल्या या सेवेकरींनी उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सेवेकरी आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने जर नंदी बैलाला विचारलं की पुन्हा एकदा त्यांचं सरकार येईल का? तर मला विश्वास आहे की शंभर टक्के नंदी बैल नाही म्हणेल. खोक्यातून सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही. तुम्ही सगळे जण एकत्र या, संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण एक मेळावा लवकरच घेऊ.असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

दरम्यान, भाजपवर केलेल्या या टीकेचा भाजप प्रवक्ते प्रवीण अलई (BJP spokesperson Praveen Alai) यांनी आपल्या खास शैलीत आक्रमकपणे समाचार घेतला आहे. ते म्हणाले, नंदीबैलाला जरी विचारलं की भाजप सत्तेत येणार आहे का तर तो देखील नाही येणार? असा टोमणा टोमणे बहाद्दर उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे मारला. उद्धवजी घरातून बाहेर पडतील का? तर याचे देखील नंदीबैल नाही असेच येईल.अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

उद्धवजी कॉंग्रेसची गुलामगिरी सोडतील का ? लाचारी सोडतील का ? दगाबाजी करणे सोडतील का ? पुन्हा प्रखर हिंदुत्वाच्या मार्गावर येतील का ? जन विकासाचे राजकारण करतील का ? या प्रश्नांची उत्तरे सुद्धा नंदीबैल नाही असेच देईल.अशी खोचक टीका करत अलई यांनी उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-