लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला पुन्हा धमकी, वांद्रे पोलिसात तक्रार दाखल

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावेळीही तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीने ही धमकी दिली आहे. शनिवारी सलमान खानचा मॅनेजर आणि जवळचा मित्र जॉर्डी पटेल प्रशांत गुंजाळकर यांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, शनिवारी अधिकृत मेल आयडीवर मुकेश गर्गकडून धमकीचा मेल आला आहे. यानंतर सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

त्यांनी सांगितले की या मेलमध्ये असे लिहिले आहे की, “गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना तुमच्या बॉस सलमानशी बोलायचे आहे. सलमानने लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत पाहिली असेलच आणि जर त्याने ती पाहिली नसेल तर पाहायला सांगा. जर तुम्हाला हे प्रकरण मिटवायचे असले तर बोलणं पूर्ण कराव लागेल. समोरासमोर काय करायचं आहे ते सांगा, वेळ असतानाच सांगितलं आहे. नाहीतर पुढच्या वेळी धक्काच मिळेल.”

सलमानच्या मॅनेजरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरुद्ध कलम १२० (बी), ३४ आणि ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मीडियामध्ये मिळालेल्या माहितीनुसार १८ मार्च २०२३ रोजी दुपारी १:४६ वाजता सलमान खानला mohitgarag<[email protected] कडून धमकी मिळाली आहे. दुसरीकडे, याआधी २२ जून रोजी सलमान खानने एका अज्ञात व्यक्तीच्या वतीने सिद्धू मुसेवालाप्रमाणे जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र लिहिले होते, ज्यासाठी वांद्रे पोलीस ठाण्यात यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती.