मोठी बातमी: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची तारिख बदलली, ‘या’ दिवशी होणार मतदान

Pune  : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने तारिख जाहीर केली होती. २७ फेब्रुवारी रोजी या पोटनिवडणूका होणार होत्या. परंतु आता राज्य निवडणूक आयोगाकडून या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. (Chinchwad and Kasba Assembly constituencies by-election Date Changed)

नवीन तारीख  २६ फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेमुळे ही निवडणूक २७ ऐवजी २६ फेब्रवारी रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, ३१ जानेवारी २०२३ रोजी उमेदावारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. ०७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल. ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १० फेब्रुवारी २०२३ रोजी अर्ज परत घेण्याची तारीख असेल.

२६ फेब्रुवारी २०२३ रोजी या जागांसाठी मतदान पार पडेल. तर ०२ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल.