निखील भामरेच्या नियुक्तीवरून भाजपवर टीका करणाऱ्या पवारांना प्रवीण अलई यांनी दाखवला आरसा; म्हणाले,…

नाशिक-  भाजपकडून सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक मधील निखित भामरे याचंही नाव या यादीत आहे. यामध्ये 1 संयोजक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे 5 सह संयोजक आहेत, त्यामध्ये निखिल भामरेची वर्णी लागली आहे. मात्र निखील भामरे याची नियुक्ती राष्ट्रवादीला खटकली आहे.

या नियुक्तीवर राष्ट्रवादीने आक्षेप नोंदवला आहे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले असून भाजपवर टीका केली आहे. सोशल मिडियात मा. पवार साहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपकडून सोशल मिडियाचा सहसंयोजक म्हणून नेमणूक केली जाते, म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचं काम भाजपच करत असल्याचं स्पष्ट झालंय. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध! भाजपच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचंय..असं म्हणत रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या टीकेला भाजपचे प्रवक्ते प्रवीण अलई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आर आर …दादा आम्ही मा शरद पवार साहेबांचा आदर करुच…परंतु…आपल्या पक्षातील पदाधिकारी यांनी काय आचरण केले बघा आधी. देशाच्या व राज्याच्या संवैधानिक पदावरिल महनीय व्यक्तिबाबत खालच्या स्तरावर भाष्य करणारे किती तरी सुकलेली गिधाडे होती, सत्ता काळात अनेक तक्रारी दाखल असताना, एक ही कारवाई करण्यात आली नाही?

महिला भगिनीना त्रास देत, नेत्यांचे बनावट मैसेज व फ़ोटो मॉर्फ करुण बदनामी चालविली त्यावेळी कुठे होतात? विकृति आणि स्वीकृति भाजपा ची नाहीच, आपल्या पक्षातिल अंर्तगत खतपाणी व फवारणी कशी व कुठे होते त्यावर लक्ष ठेवा. त्यामुळे शिल्लक कर्तुत्व आणि नेतृत्व आपण जपावे. बाकी राज्याचे उपमुख्यमंत्री सक्षम आहेत असं अलई यांनी म्हटले आहे.