PAKvsSL: पाकिस्तानच्या ‘चिटिंग’वर भडकले क्रिकेट चाहते, बाबर आझमच्या संघाला केले ट्रोल

Kusal Mendis Controversial Catch: कुसल मेंडिसने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतकी खेळी (Kusal Mendis Century) खेळली. कुसल मेंडिसने 77 चेंडूत 122 धावा केल्या. या यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार मारले. पण कुसल मेंडिस ज्या पद्धतीने पॅव्हेलियनमध्ये परतला तो सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय राहिला आहे. वास्तविक, हसन अलीच्या चेंडूवर इमाम उल हकने (Imam-Ul-Haq) कुसल मेंडिसला झेलबाद केले. इमाम उल हकने सीमारेषेजवळ कुसल मेंडिसचा झेल घेतला. पण सोशल मीडियावरील चाहत्यांचे म्हणणे आहे की इमाम उल हकने क्लीन कॅच घेतला नाही.

सोशल मीडियावर चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला…
सोशल मीडिया यूजर्स पाकिस्तानी टीम आणि इमाम उल हकवर फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत. कुसल मेंडिस नाबाद असल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे मत आहे. मात्र इमाम उल हक आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी फसवणूक केली.

सोशल मीडिया यूजर्सनी बाबर आझमच्या टीमला फटकारले
मात्र, आता सोशल मीडिया यूजर्स बाबर आझमच्या (Babar Azam) टीमवर टीका करत आहेत. सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करून आपला संताप व्यक्त करत आहेत.

https://x.com/TasneemKhatai/status/1711699871751901626?s=20

त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने 50 षटकात 9 गडी गमावून 344 धावा केल्या. अशा प्रकारे पाकिस्तानसमोर विजयासाठी 345 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात अब्दुल्ला शफीकने 113 धावा आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने 131 धावा केल्या. अशाप्रकारे पाकिस्तानने 48.2 षटकातच सामना खिशात घातला.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया