‘नंदीबैलाला जरी विचारलं की भाजप सत्तेत येणार आहे का तर तो देखील नाही असंच म्हणेल’

Uddhav Thackeray – ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपची धुलाई केली आहे. नंदीबैलाला जरी विचारलं की भाजप सत्तेत येणार आहे का तर तोदेखील नाही असंच म्हणेल असाही टोला ठाकरेंनी लगावला. महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे सेवेकऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पारंपरिक वेशात आलेल्या या सेवेकरींनी उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सेवेकरी आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने जर नंदी बैलाला विचारलं की पुन्हा एकदा त्यांचं सरकार येईल का? तर मला विश्वास आहे की शंभर टक्के नंदी बैल नाही म्हणेल. खोक्यातून सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही. तुम्ही सगळे जण एकत्र या, संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण एक मेळावा लवकरच घेऊ.

शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava At Mumbai Shivaji Park) ही आपली परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहील. यावर्षी सुद्धा आपला दसरा मेळावा वाजत वाजत शिवाजी पार्कवर होणार आहे, तुम्ही सुद्धा या दसरा मेळाव्याला या असं आमंत्रणही उद्धव ठाकरे यांनी सेवेकरींना दिलं.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया