भाजपला एकदोन नव्हे तर तब्बल 40 ठिकाणांचे नाव बदलायचे आहेत

 नवी दिल्ली – दिल्ली एमसीडी निवडणुकीपूर्वी (Before the Delhi MCD elections) आता दिल्लीतही गावांची नावे बदलण्याचे राजकारण सुरू झाले आहे. दिल्ली भाजपला (Delhi BJP) राजधानी दिल्लीतील 40 गावांची नावे बदलायची आहेत. दिल्लीत अशी 40 गावे (40 villages) आहेत ज्यांची नावे भाजपला बदलायची आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता (Aadesh Gupta) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ते म्हणाले, आम्ही खूप चांगले काम करत आहोत, त्यामुळे देशाचा स्वाभिमान आणि अभिमान वाढतो आहे. आम्ही सुचवलेली 40 गावांची नावे मुघल काळातील (Mughal period) इतिहासातील गुलामगिरीच्या मानसिकतेशी संबंधित आहेत. आम्हाला ती नावे नको आहेत. गावातील लोकांनाही हे नाव नको आहे कारण त्यातून गुलामगिरीची मानसिकता (The mentality of slavery) दिसून येते.

आज त्या गावांची नावे बेर सराय, जिया सराय, युसूफ सराय, जाफरपूर कलान, नजफगढ, हौज खास, सुलतानपूर, रसूलपूर अशी आहेत. अशी नावे बदलण्याची प्रक्रिया दिल्ली सरकारकडे आहे. आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला चांगली संधी आहे, जेव्हा देश अभिमानाने पुढे जाईल, तेव्हा या ठिकाणांची नावे बदलली पाहिजेत.  या 40 गावांची नावे अशा समाजसेवकांच्या (social workers) नावावर ठेवावीत, ज्यांनी या देशाचे नाव उंचावले आहे.  कॅप्टन विक्रम बत्रा, मोहनचंद शर्मा , लता मंगेशकर, अटलबिहारी बाजपेयी, मिल्खा सिंग, क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकणारे यशपाल शर्मा , अश्फाक उल्ला खान, अंकित शर्मा, लक्ष्मीबाई यांच्या नावावर गावांची नावे ठेवली पाहिजेत.असं ते म्हणाले.