‘राजकारणात विरोध करणाऱ्यांचा सन्मान करायचा असतो, अशी शिकवण शरद पवार यांनी आम्हाला दिली आहे’

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी (ST Workers)आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली . यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. दरम्यान, काल घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून या मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवार यांच्या निवास्थानावर झालेला हल्ला म्हणजे महराष्ट्राच्या राजकीय संस्कृती अपमान आहे. महराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत मतभेत होते परंतु, मनभेद कधीच नव्हते.

गेल्या 50 वर्षांपासून शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्त केले आहे. एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात नेतृत्व गेले की काय होतं हे आज जनतेने पाहिलं आहे. राजकारणात विरोध करणाऱ्यांचा सन्मान करायचा असतो, अशी शिकवण शरद पवार यांनी आम्हाला दिली आहे. आज त्यांच्या घरी ते स्वत:, त्यांची पत्नी आणि नात हे तिघेच घरात असताना असा क्रूर हल्ला करण्यात आला. हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.