शाहीन बाग परिसरात एनसीबीची कारवाई, 50 किलो हेरॉइन आणि 30 लाख रुपये जप्त

नवी दिल्ली –  एनसीबीने (NCB) शाहीन बागच्या जामिया नगरमध्ये ( In Jamia Nagar of Shaheen Bagh ) 50 किलो हेरॉईन (Heroin) जप्त केले आहे. यादरम्यान एका घरातून 30 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीनही सापडले आहे. दिल्ली उत्तर विभागाचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी ( DDG Dnyaneshwar Singh) सांगितले की, बुधवारी निवासी परिसरातून हे ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आले. ते म्हणाले की, आम्ही आतापर्यंत 1 व्यक्तीला अटक केली आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईवरून यामागे एका आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात असून लवकरच त्याचा पर्दाफाश करू, असे दिसते.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार, हे हेरॉईन अफगाणिस्तानातून (Afghanistan) आले होते, तर रोकड हवालाद्वारे आणण्यात आली होती. सागरी मार्गाने आणि सीमेवरून अमली पदार्थ आणले जात होते. हेरॉईन पॅक करून फ्लिपकार्टच्या (Flipkart) पॅकिंगमध्ये आणले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेरॉईन झाडाच्या फांदीत पोकळी बनवून समुद्रात आणि नंतर पाकिस्तान सीमेवरून ( Pakistan border) लपवून भारतात आणले होते.  या हेरॉईनचा दर्जा नुकताच अटारी येथून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांसारखाच आहे. आता एनसीबी विविध शहरांमध्ये छापे टाकून या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे.