अयोध्येत दंगल घडवण्याचा कट फसला, मशिदीबाहेर आक्षेपार्ह वस्तू फेकल्या, 7 जणांना अटक

अयोध्या – अयोध्या (Ayodhya) आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वातावरण बिघडवण्याचा आणि दंगली (Riot) भडकवण्याचा अराजक घटकांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. तीन मशिदींसह चार ठिकाणी आक्षेपार्ह पोस्टर्स (Offensive posters), धार्मिक ग्रंथांच्या प्रती (Copies of religious texts) आणि डुकराचे मांस (Pork) फेकल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, महेश कुमार मिश्रा, प्रत्युष श्रीवास्तव, नितीन कुमार, दीपक कुमार गौर उर्फ गुंजन, ब्रिजेश पांडे, शत्रुघ्न प्रजापती आणि विमल पांडे अशी अटक केलेल्या सात आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी अयोध्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एसएसपी शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की, याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर चार आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.अटक करण्यात आलेल्या लोकांच्या चौकशीदरम्यान, त्यांना शहरातील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवायचे होते, असे समोर आले, असे ते म्हणाले.

एसएसपी म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्शाह जामा मशीद ( Tatshah Jama Masjid ), मशीद घोसियाना ( Ghosian Masjid ) आणि काश्मिरी मोहल्ला मशीद (Kashmiri Mohalla Masjid) या तीन मशिदींबाहेर आक्षेपार्ह वस्तू फेकण्यात आल्या. याशिवाय कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत गुलाब शाह बाबा यांच्या दर्ग्यावरही ( Dargah of Gulab Shah Baba ) आक्षेपार्ह वस्तू फेकण्यात आल्या.

एसएसपी म्हणाले, महेश मिश्रासोबत चार मोटारसायकलवर आलेल्या एकूण आठ जणांनी मशिदी आणि दर्ग्यावर आक्षेपार्ह पोस्टर आणि वस्तू फेकल्या. त्यांनी फेकलेल्या आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. एका निवेदनात, अयोध्या पोलिसांनी महेश मिश्रा या संपूर्ण प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ म्हणून वर्णन केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जहांगीरपुरी हिंसाचाराचा ( Jehangirpuri violence) बदला घेण्यासाठी त्याचे संपूर्ण नियोजन महेशच्या घरी करण्यात आले होते. आरोपींनी त्यांच्यासोबत कुराण आणि डुकराचे मांस आणले होते, जे मशिदीबाहेर फेकून पळून गेले होते. आरोपीविरुद्ध भादंवि कलम २९५ आणि २९५-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.