मिथुन चक्रवर्तींना ‘डिस्को डान्सर’ बनवणाऱ्या दिग्दर्शकाच्या मुलीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन

B Subhash Daughter Passed Away: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक बी सुभाष यांची कन्या श्वेता बब्बर हिने या जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेताचा मृत्यू शनिवारी म्हणजेच 22 जुलै रोजी झाला. गेल्या वर्षी बी सुभाषची पत्नी त्यांना सोडून गेली आणि आता त्यांची मुलगी त्यांना एकटी सोडून गेली आहे.

श्वेता बब्बर (Shweta Babbar) शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 19 जुलै रोजी श्वेता घरात पडल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिच्या पाठीच्या कण्यामध्ये क्लॉटिंग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की, श्वेताला अशा ठिकाणी क्लॉटिंग झाले आहे, ज्यामुळे शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तपुरवठा थांबला होता.

रुग्णालयात तीन दिवस जीवन-मरणाची झुंज दिल्यानंतर श्वेताने अखेर या जगाचा निरोप घेतला. तिचे वय अवघे 48 वर्षे होते. पत्नीनंतर आता बी सुभाष मुलीच्या मृत्यूने तुटले आहेत. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे.