Eknath Shinde | काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून वापरले, मुख्यमंत्री शिंदेंनी साधला निशाणा

Eknath Shinde | एका सर्वसामान्य शिवसैनिक, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने त्यांना प्रचंड पोटदुखी झाली आहे. त्यामुळेच ते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. शिव्या देत आहेत. पण हा शिवीगाळ मलाच नव्हे तर राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मराठा आणि बहुजनांनाही आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. मात्र, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत. सत्ता गेल्यापासून ते वेडेपिसे झाले आहेत. मणिशंकर अय्यर आणि काँग्रेसची भाषा बोलू लागले आहेत. पण, मी त्यांना कामातून उत्तर देईन, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाथरी येथील सभेत बोलताना दिले.

परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने मौलाना आझाद महामंडळाचा निधी ३० कोटींवरुन ५०० कोटींपर्यंत वाढवला आहे. सरकारने सर्वच समाज्याला न्याय देण्याचे काम केले. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ते मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, असे सरकारचे उद्दिष्ट आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून वापरले आणि त्यांना गरिबीत ठेवले, अशी टीका त्यांनी केली.

बाळासाहेबांच्यावेळी साबीर शेख मंत्री होते. आताच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत. सगळे एकत्र येऊन राज्याचा विकास करत आहेत. त्यामुळे संविधान बदलण्याचे विरोधकांचे आरोप खोटे आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा