Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय खास आहे? A ते Z तपशील जाणून घ्या 

Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) सर्वसाधारण अर्थसंकल्प-2023 सादर करत आहेत. अर्थमंत्र्यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची (Agriculture) विशेष काळजी घेतली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. किसान समृद्धी योजनेनंतर या वर्षी सरकारने इतर अनेक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. पशुपालक आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सहकारातून शेतकऱ्यांसाठी समृद्धी कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणा केली आहे. याद्वारे 63000 कृषी सोसायट्या संगणकीकृत केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईल. यासोबतच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि बहुउद्देशीय कॉर्पोरेट सोसायट्यांच्या क्षेत्रात कर्ज देण्याची गती वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यासोबतच अर्थमंत्र्यांनी प्रधानमंत्री मत्स्य पालन योजनाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय सहकारातून समृद्धी हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार आहे.याद्वारे 63000 कृषी सोसायट्या संगणकीकृत केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईल.पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन क्षेत्रात कर्ज देण्याचा वेग वाढवण्यात येणार आहे.मल्टीपर्पज कॉर्पोरेट सोसायटीला प्रोत्साहन दिले जाईल.मत्स्यव्यवसायासाठी कॉर्पोरेट सोसायट्याही वाढवल्या जातील.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
पुढील तीन वर्षांत १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाईल.10 हजार बायो इनपुट रिसर्च सेंटर्सची स्थापना करण्यात येणार आहे.त्यासाठी सूक्ष्म खतावर भर दिला जाणार आहे. मिस्ट्री (मॅन ग्रोन प्लांटेशन) वर भर दिला जाईल.