“आमिर खानने तर त्या चित्रपटात बलात्कार…”, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी किरण राववर साधला निशाणा

Sandeep Reddy Wanga – ‘ॲनिमल’ हा 2023 सालातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Wanga) दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्याचबरोबर काही लोक या चित्रपटावर जोरदार टीकाही करत आहेत. बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आता उघडपणे ‘ॲनिमल’ला महिलाविरोधी चित्रपट म्हणू लागली आहेत. या यादीत आमिर खानची माजी पत्नी किरण रावचेही नाव जोडले गेले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान किरण रावने ‘ॲनिमल’ चित्रपटाला महिलाविरोधी चित्रपट म्हटले होते. किरणचे हे विधान चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना पटले नाही आणि त्यांनी किरण राववर जोरदार निशाणा साधला आणि आमिर खानवरही (Aamir Khan) निशाणा साधला.

आमिर खानची माजी पत्नी किरण राव हिने एका मुलाखतीदरम्यान ‘ॲनिमल’ चित्रपटाला महिला विरोधी म्हटले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना त्यांचे शब्द पचवता आले नाहीत. या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप रेड्डी वांगा म्हणाले, ‘जेव्हा तुम्हाला काहीच कळत नाही, तेव्हा तुम्ही गप्प बसावे. जर कोणी जाऊन किरणला आमिर खानचा ‘दिल’ चित्रपट बघायला सांगितला तर तिला समजेल की हा चित्रपट किती स्त्रीविरोधी आहे.’

आमिर खानवर टोमणा मारला
संदीप आपले बोलणे चालू ठेवत म्हणाले, ‘आमिर खानने फार पूर्वी एक गाणे केले होते, ‘खंभे जैसी खडी है… लडकी है या फुलझाडी है’ किरण, आमिरला या गाण्याचा अर्थ विचार आणि मग ‘ॲनिमल’ बद्दल बोल. इतकंच नाही तर ज्या मुलीसोबत आमिर खान ‘दिल’ चित्रपटात जबरदस्ती अर्थातच बलात्कार करायला तयार होतो, नंतर चित्रपटात तीच मुलगीही आमिरच्या प्रेमात पडते. आता सांगा कोणता चित्रपट स्त्रीविरोधी होता.’

‘ॲनिमल’ चित्रपटाबद्दल..
संदीप रेड्डी यांचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट पिता-पुत्राच्या गुंतागुंतीच्या नात्याभोवती विणलेला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने मुलाची भूमिका साकारली असून अनिल कपूर त्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटात रणबीरच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला होतो, तेव्हा तो वडिलांच्या शत्रूंकडून कसा सूड घेतो, हे ‘ॲनिमल’मध्ये मोठ्या तपशिलाने दाखवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा