राज्याच्या विकासासाठी केंद्राचा आशीर्वाद महत्त्वाचा – एकनाथ शिंदे 

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Union Minister Rajnath Singh and President Ramnath Kovind) यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल असं म्हटलं आहे.

शिंदे म्हणाले, एका विचारातून, हिंदुत्वाचा अजेंडा, बाळासाहेबांच्या भूमिकेतून या सर्व घडामोडी झाल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत निवडणुका लढवल्या आहेत. लोकांच्या मनामधील सत्ता, सर्वसामान्य लोकांच्या मनामधील सरकार अशी भूमिका घेऊन लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणं सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळं वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत.

राज्यात जे काय आम्ही सरकार स्थापन केलंय ते लोकांचं आहे, लोकांच्या हिताचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या शेतकरी, कष्टकरी आणि कामगार (Farmers, laborers and workers)  यांना न्याय देणारं हे सरकार आहे. केंद्र सरकारची मदत आणि आशीर्वाद आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत, महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन समजून घेणार आहोत. राज्याच्या विकासात केंद्राचा वाटा असतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.