आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे

Sushma Andhare : सध्या मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषदेतून त्यांच्यावर कडाडून टीका करणारे छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघांचाही फोकस हलला असून राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे, यावरुन आता शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी जरांगेवर हल्लाबोल केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील पूर्ण प्रयत्नाने लढत आहेत, असं सुरूवातीला वाटलं होतं. पण मागील काही दिवसांपासून त्यांची वक्तव्ये पाहिली तर त्यांचा आरक्षणावरून फोकस हललेला दिसून येतो आहे. अगदी छगन भुजबळ यांची लायकी काय? इथपर्यंतचा त्यांचा तोल घसरला आहे. जरांगे पाटलांना व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणं शोभत नाही, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे यांना खडसावलं आहे.

त्याचवेळी आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे १०० जेसीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने बंद खोलीत दिलेलं वचन पुर्ण केलं..’, कर्णधारपदी विराजमान झाल्यावर सूर्याचा रोहितबाबत खुलासा

‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी