गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादावर छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा समाजातच…”

Jalgaon : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावाविषयी (Gautami Patil Surname) नवी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या आडनावावरून पुण्यात चक्क बैठक पार पडली आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

त्यावर गौतमी पाटील हिने आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गौतमीच्या या भूमिकेवरुन तिच्यावर टीकाही होत आहे आणि काही लोक तिच्या समर्थनार्थही बोलच आहेत. अशातच आता खुद्द संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.