IND vs ENG: ‘इंग्लंड संघ भारताला 5-0 ने हरवेल’, माजी क्रिकेटपटूचा रोहित शर्माला इशारा!

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली होती. मात्र दुसऱ्या डावात फलंदाजी करताना संघ गडगडला. टीम इंडिया आता दुसऱ्या टेस्टसाठी विशाखापट्टणमला पोहोचणार आहे. याआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पानेसरने या मालिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेत भारताचा 5-0 असा पराभव करू शकतो, असे पानेसरने म्हटले आहे. मात्र ऑली पोप आणि टॉम हार्टली यांना चांगली कामगिरी करावी लागेल.

हार्टले आणि पोप यांनी हैदराबाद कसोटीत इंग्लंडकडून चमकदार कामगिरी केली होती. इंडिया टुडे मधील एका बातमीनुसार, पानेसर म्हणाला, “ऑली पोप आणि टॉम हार्टली यांनी चांगली कामगिरी सुरू ठेवल्यास व्हाईटवॉश होऊ शकतो. इंग्लंड 5-0 ने जिंकू शकतो. पण ते ऑली पोप आणि टॉम हार्टले यांच्या खेळावर अवलंबून असेल. हा (हैदराबाद कसोटी) मोठा विजय आहे. इंग्लंड हरेल असे सर्वांना वाटत होते. पण पोपने चमकदार कामगिरी केली आहे.”

हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 246 धावा करत सर्वबाद झाला. तर दुसऱ्या डावात संघाने 420 धावा केल्या. पोपने दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी दमदार कामगिरी केली. त्याने 278 चेंडूंचा सामना करत 196 धावा केल्या. या काळात त्याने 21 चौकार मारले. हार्टलेबद्दल बोलायचे झाले तर त्याने भारताच्या पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. त्याने रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अक्षर पटेल आणि श्रीकर भरत यांना बाद केले.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल