इंदापुरात वातावरण तापलं! हर्षवर्धन पाटलांना तालुक्यात फिरु न देण्याची धमकी, फडणवीसांना लिहिले पत्र

इंदापुरात वातावरण तापलं! हर्षवर्धन पाटलांना तालुक्यात फिरु न देण्याची धमकी, फडणवीसांना लिहिले पत्र

Harshvardhan Patil: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राज्यातील वातावरण तापत आहे. आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आपल्याला इंदापुरात फिरु न देण्याची धमकी आल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती, असे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.

यावर वडिलांना धमकी दिली तर ठाकरे शैलीत उत्तर देणार, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी दिला आहे. प्रत्येकाने संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावं, असं आवाहन अंकीता पाटील यांनी केलं आहे. “माझ्या वडिलांबाबत असं एकेरी शब्द तुम्ही वापरत असाल, जे तालुकाध्य आहेत, लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती असतात, ते माझ्या वडिलांबाबत असे शब्द उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं. ही आपली संस्कृती नाहीय. मला त्यांना एकच सांगायचं आहे, पातळी सांभाळून बोला. आम्हीपण आमची पातळी सांभाळून बोलत आहोत”, असं अंकिता पाटील म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal

Previous Post
शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन

Next Post
'वडिलांना धमकी दिली तर...', हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

Related Posts
Pune News | "फडणवीसांना राजकारणात जेवढं लांब दिसतं, तेवढं..." सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरुन चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य

Pune News | “फडणवीसांना राजकारणात जेवढं लांब दिसतं, तेवढं…” सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरुन चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य

Pune News | पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्लस्टर चे प्रमुख म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil)महायुतीतील सर्वपक्षीय प्रमुख…
Read More
pawar - shinde - fadanvis

राज्यात झालेले सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही; शरद पवारांचा दावा

मुंबई – सत्ता केंद्रीत करणारा प्रयत्न ताकद देण्याचा असू शकतो परंतु जनता बोलत नाही ती बघत असते, निरीक्षण…
Read More

Budget 2023 : युवकांसाठी बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत ‘या’ मोठ्या घोषणा 

Budget 2023 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2023-2024 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प…
Read More