स्कूल वाली लव्हस्टोरी! सीएसकेच्या तुषार देशपांडेने बालपणीच्या क्रशसोबत गुपचूप उरकला साखरपुडा

Tushar Deshpande Engaged : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे (Tushar Deshpande) याने सोमवारी म्हणजेच १२ जून २०२३ रोजी आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. तुषार देशपांडेने त्याची प्रेयसी आणि बालपणीची मैत्रीण नभा गड्डमवार (Nabha Gaddamwar)  हिच्याशी साखरपुडा केला आहे. त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तुषार देशपांडेच्या साखरुपुड्याला त्याचा सहकारी खेळाडू शिवम दुबेही पोहोचला होता.

वयाच्या २८ व्या वर्षी तुषार देशपांडेने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. आयपीएल २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर तुषारने त्याच्या बालपणीच्या क्रशसोबत साखरपुडा उरकला आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तुषारने ही आनंदाची बातमी सांगितली आहे.

तुषार देशपांडेची होणारी पत्नी काय करते?
नभा गड्डमवार ही व्यवसायाने चित्रकार असून त्या भेटवस्तूही डिझाइन करते. तिचे एक इंस्टाग्राम पेज आहे जिथे ती तिच्या पेंटिंग्ज आणि इतर कामांचे फोटो शेअर करते. आयपीएलमध्ये अनेक वेळा नभा तुषारला स्टँडमधून सपोर्ट करताना दिसली आहे.