Mansi Naik | टाळ्यांच्या गजरात धाराशिवकरांनी धरला ‘मानसी’च्या तालावर ठेका!

Mansi Naik Lavni: सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्तवतीने आयोजित या महोत्सवात शनिवारी सांयकाळी ७वा ‘संस्कृती महाराष्ट्राची’ या कार्यक्रम अंतर्गत सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक (Mansi Naik) यांनी सादर केलेल्या विविध लावणी प्रकाराने धाराशिवकरांचे मने जिंकुन ठेका धरायला लावला. महाराष्ट्रातील कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजाळा देण्याचे काम केले. त्यामध्ये विविध कलाकारांनी प्रत्येक कलाप्रकार हा प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवला. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत लावणी हा कलाप्रकार सादर करण्यात आला. यामध्ये सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रींनी लावणी सादर करून प्रेक्षकांना मोहित केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

लावणी या कार्यक्रमातील तसेच संस्कृती महाराष्ट्राची या कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक यांनी सादर केलेल्या विविध लावणी प्रकार होय. मानसीने सादर केलेल्या लावणीवर धाराशिवकरांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही.प्रेक्षकांना जणू मानसीच्या लावणीची भुरळच पडली. त्यामुळे धाराशीवकरांनी मानसीच्या लावणीवर टाळ्यांचा गजर करत ठेका धरला. सायंकाळच्या अतिशय प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव व साहित्यिक युवराज नळे यांची प्रमुख उपस्थिती होती.महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमाने तुळजाभवानी स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

महत्वाच्या बातम्या : 

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: Nana Patole

स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेच्या तंबूत घुसून ८-१० जणांनी केलं नकोसं कृत्य

अंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी? प्री-वेडिंग अटेंड करायला PSL सोडून आला दिग्गज खेळाडू