भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेपूर्वी ‘या’ क्रिकेटरने जाहीर केली निवृत्ती?

Cricketer Test Retirement: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी एका अनुभवी क्रिकेटपटूने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची (David Warner) पत्नी कँडिस वॉर्नरने (Candice Warner) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नरची ही पोस्ट पाहून लोक थक्क झाले. कँडिस वॉर्नरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती डेव्हिड वॉर्नर आणि मुलींसोबत दिसत आहे.

ही पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नरने लिहिले, ‘कसोटी क्रिकेटसह दौऱ्यासह आमच्यासाठी एका युगाचा शेवट. एक सुखद प्रवास झाला आहे. मी सर्व सहाय्यक लोक आणि महिला क्रू यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांचे आभार देखील मानू इच्छिते. डेव्हिड वॉर्नर आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.’