Pune News: ससून रूग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना धक्का, अधिष्ठातापदावरून उचलबांगडी

Dr Sanjeev Thakur : पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थ प्रकरणी चौकशी अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉक्टर देवकाते यांचं निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे. चौकशीत अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि डॉक्टर देवकाते तसंच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी असल्याचं दिसून आलं; त्यामुळे घटनेचं गांभीर्य विचारात घेऊन अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ससून रुग्णालयातील अमली पदार्थ तस्करी प्रकरणाबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल शासनाला 31 ऑक्टोबर रोजी सादर केला होता, असं वैद्यकीय शिक्षण विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर