निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले,…

Mumbai – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह(sign) गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

दरम्यान, या घडामोडींवर शिंदे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थानिक लोकांनी गळा काढू नये. मुळात हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. बहुमत असूनही आमचा दावा नाकारला गेला आहे. त्यांनी सतत फक्त आयोगाकडे तारखा मागितल्या, कागदपत्र सादर केली नाही. त्यामुळे वेळेत निर्णय होऊ शकला नाही”, असं शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. खऱ्या अर्थाने धनुष्यबाण चिन्हावर आमचाच अधिकार आहे. आमच्याबरोर आमदार खासदार जिल्हाप्रमुख, नगरसेवक आहेत. आज धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने दुख झाल्याचे जे सांगतात, तेच या निर्णयाला जबाबदार आहेत. आम्ही वेळेवर कागदपत्रे दाखल केले असताना त्यांनी वेळोवेळी तारखा मागितल्या आहेत. त्यामुळेच आयोगाने हा निर्णय दिला”, अशी प्रतिक्रिया केसकर यांनी दिली आहे.