Usha Gokani Passes Away: महात्मा गांधीजींची नात उषा गोकाणी यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची नात उषा गोकाणी (Usha Gokani Passes Away) यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या आणि बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. मणिभवनचे कार्यकारी सचिव मेघश्याम आजगावकर यांनी सांगितले की, ८९ वर्षीय गोकाणी ह्या गेल्या पाच वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होत्या. गोकाणी या गांधी स्मृती निधी, मुंबईच्या माजी अध्यक्ष होत्या.

उषा गोकाणी यांचे बालपण वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गेले. या आश्रमाची स्थापना महात्मा गांधींनी केली होती. गांधी स्मृती निधी, मुंबईची स्थापना अनेक विधायक उपक्रम राबविण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. महात्मा गांधी त्यांच्या हयातीतच याच्याशी जोडले गेले होते. महात्मा गांधी १९१७ ते १९३४ पर्यंत अनेक वेळा मणिभवनात राहिले होते.