दिल्ली मेट्रोत जोडप्याचा कारनामा पाहून प्रवाशांनी मिटले डोळे, Video होतोय व्हायरल

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो आणि त्याच्याशी संबंधित व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी कोणी एकमेकांच्या झिंज्या ओढतं, कोणी गाण्यावर अतरंगी डान्स करतं तर कोणी प्रेमात आकंठ बुडालेलं असतं. पण आता याच मेट्रोमधील आणखी एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून दिल्ली मेट्रो बंद करण्याची वेळ आली आहे अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

खरं तर, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक जोडपे कोल्ड ड्रिंकचा आस्वाद घेत असून, त्यानेच एकमेकांच्या तोंडात चूळ टाकताना दिसत आहेत. मेट्रोमध्ये त्यावेळी जास्त गर्दी नसल्याचे त्या व्हिडीओत दिसत आहेत. एक मुलगी सीटवर बसली असून तरूण तिच्यासमोर जमिनीवर एक गुडघा टेकून बसला आहे. त्याच्या हातातील कोल्डड्रिंकच्या कॅनमधील थोडं पेय त्याने तिच्या तोंडात ओतलं आणि नंतर तिने तेच कोल्डड्रिंक त्याच्या तोंडात सोडलं. असं दोन-तीन वेळा सुरू होतं. अवघ्या काही सेकंदांचा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या तोंडून ईईई अशी प्रतिक्रिया निघत आहे.

महत्वाच्या बातम्या-

व्हायब्रंट गुजरात समिटबाबत महाराष्ट्र सरकारचा मौन का ? शरद पवार गटाचा थेट सवाल

‘नागिन’ फेम अभिनेत्रीवर मोठा आघात; Israel-Hamas युद्धात कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू

हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?