हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?

congress supports palestine : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत (Israel-palestine war) काँग्रेसची भूमिका एका दिवसात बदलली आहे. हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याचा रविवारी पक्षाने निषेध केला. मात्र, सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीत (CWC) ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाने पॅलेस्टिनींना जमीन, स्वराज्य आणि स्वाभिमानाने जगण्याच्या हक्काचे समर्थन केले आणि आपला जाहीर पाठींबा दिला.

दरम्यान, काँग्रेसने पॅलेस्टिनींना पाठींबा दिला मात्र इकडे अडचण मात्र ठाकरे गटाची झाली आहे. याच मुद्द्यावरून भाजपने ठाकरे गटाला खिंडीत पकडले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्द्यावरून शरसंधान केले, ते म्हणाले, अल्पसंख्यांकांच्या वोटबँकेसाठी इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याच्या ऐवजी पॅलेस्टिनची बाजू घेतली. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?

कांग्रेसशी हातमिळवणी केली तरी हिंदुत्व सोडले नाही म्हणायचे आणि दुसरीकडे काँग्रेसच्या अल्पसंख्य अनुनयाला साथ द्यायची हा दुटप्पीपणा आहे. उद्धवराव हिंमत असेल तर इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यांचा आणि हमासचा निषेध करा. त्याचबरोबर काँग्रेसचाही निषेध करून दाखवा. आहे हिंमत? असा तिखट सवाल त्यांनी केला आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया