IND vs AFG: किंग कोहलीने सामन्यादरम्यान लगावले ठुमके! विराटच्या डान्सचा Video सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

Virat Kohli Dance Went Viral: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) संघात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर विश्वचषक सामना झाला. या सामन्यात लोकल बॉय विराट कोहलीने (virat Kohli) दिल्लीकरांचे चांगलेच मनोरंजन केले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ८ बाद २७२ धावा केल्या. अफगाणिस्तान संघाची फलंदाजी सुरू असताना विराट कोहलीने चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडली नाही. विराटशी पंगा घेणारा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नवीन-उल-हक फलंदाजीसाठी मैदानावर आल्यानंतर चाहत्यांनी कोहलीच्या नावाचा जयघोष सुरू केला.

शिवाय क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीने आपले डान्स मूव्ह्स दाखवत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच प्रसिद्ध होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

व्हायब्रंट गुजरात समिटबाबत महाराष्ट्र सरकारचा मौन का ? शरद पवार गटाचा थेट सवाल

‘नागिन’ फेम अभिनेत्रीवर मोठा आघात; Israel-Hamas युद्धात कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू

हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?