‘नागिन’ फेम अभिनेत्रीवर मोठा आघात; Israel-Hamas युद्धात कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू

Madhura naik family in israel:  अवघ्या जगाचे लक्ष सध्या इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षाकडे लागले आहे. इस्राईलवरील हमासने केलेय दहशतवादी हल्ल्यानंतर युद्धाला प्रारंभ झालां आहे. यातच  अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि इटलीनं काल संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इस्राईलला पाठिंबा दिला आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्राईलवर केलेल्या हल्ल्याचा या देशांनी तीव्र निषेध केला आहे. इस्राईलमध्ये आपल्या नऊ नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. ब्रिटनचे दहा आणि नेपाळचेही दहा नागरिक इस्राईलमध्ये मारले गेले आहेत. ऑस्ट्रिया आणि जर्मनीनं पॅलेस्टाईनला मदत स्थगित केल्याचं जाहीर केलं आहे.

भारतातील छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ आणि ‘उतरन’ फेम अभिनेत्री मधुरा नायक (Naagin Actress Madhura Naik) हिच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या युद्धात तिच्या घरातील माणसं मारले गेले आहेत. त्यामुळे मधुरा आणि तिचे कुटुंबीय प्रचंड हादरून गेले आहेत.

मधुरा नायक हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून अत्यंत दु:खी होत ही धक्कादायक माहिती दिली आहे. “मी मधुरा नायक. भारतात जन्मलेली यहुदी आहे. भारतात फक्त 3 हजार यहुदी आहेत. 7 ऑक्टोबरच्या आधी आमच्या कुटुंबातील एक मुलगी आणि एका मुलाला आम्ही गमावलं आहे. माझी बहीण ओडाया आणि तिच्या नवऱ्याला हमासच्या दहशतवाद्यांनी ठार मारलं आहे. तेही त्यांच्या दोन मुलांसमोरच. आज माझं कुटुंब ज्या वेदना आणि त्रासाला सामोरे जातंय ते शब्दात सांगता येणं कठिण आहे. आज इस्रायल संकटात आहे. हमासच्या आगडोंबात लहान मुलं, स्त्रिया आणि म्हातारी माणसं होरपळून निघत आहेत,” असं मधुराने व्हिडिओत सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया