दुल्हन हम ले जायेंगे! सलमान खान अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत करतोय लग्न?

Salman Khan Marriage: बॉलीवूडचा ‘दबंग खान’ अर्थातच सलमान खान हा हिंदी इंडस्ट्रीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. तो ५७ वर्षांचा असून अजूनही त्याने लग्न केलेले नाही. मात्र नेहमी सलमानच्या लग्नाच्या अफवा उडत असतात. अशात आता सलमान लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे. तो सुप्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न करणार आहे, अशी चर्चा आहे. त्यांच्या लग्नाची बातमी समजताच चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याआधीही अनेकवेळा वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत सलमानच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या, त्या निव्वळ अफवा ठरल्या. अशातच पुन्हा एकदा सलमान लवकरच लग्न करणार असल्याचा दावा केला जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमान खान (Salman Khan) आणि ४८ वर्षीय करिश्मा कपूर दोघेही लग्न करणार आहेत (salman khan marriage with karishma kapoor), मात्र अद्याप सलमान किंवा करिश्माने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. अभिनेत्री करिश्माचं लग्न दिल्लीचा बिझनेसमन संजय कपूरसोबत झालं होतं. मात्र नंतर हे नातं फार काळ टिकू शकलं नाही अभिनेत्रीने पती संजय कपूरपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. करिश्माला दोन मुलं आहेत. मात्र काही दिवसांपासून सलमानचं नाव या अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान आणि अभिनेत्री करिश्माचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते. त्यानंतर सलमानचे हे फोटो पाहून तो लवकरच लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोघांचे एकत्र फोटो पाहून दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. अलीकडेच करिश्माने सलमान खानसोबतच्या ईद पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. तेव्हापासून या दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. मात्र या दोघांचं नात मैत्रीचं असून त्यांच्या लग्नाच्या बातम्या फक्त अफवा असल्याचं कळतंय.

सलमान आणि करिश्माने दुल्हन हम ले जायेंगे या चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच जीत या चित्रपटातही ते एकत्र झळकले होते.