देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या; ब्राह्मण महासंघाचं नड्डांना पत्र

Pune –   भाजपाने नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे.याबाबत फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता   देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Akhil Bharthiya Brahman Mahasangh) केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असा ब्राम्हण महासंघाला विश्वास आहे. भाजपा नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (Govind Kulkarni) यांनी व्यक्त केली आहे.