Shriya Pilgaonkar | सचिन-सुप्रिया पिळगावकर यांनी श्रियाला दत्तक घेतलंय? चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

श्रिया पिळगावकरने (Shriya Pilgaonkar) मराठी, हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. ‘मिर्झापूर’ वेब शोमध्ये ‘स्वीटी’ची भूमिका करून तिला ओळख मिळाली. ती एक उत्तम कलाकार आहे, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. ती तिचे आई-वडील सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावकर यांची दत्तक मुलगी असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. आता खुद्द अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली असून आता जन्माचा दाखलाही दाखवणार नाही, असे सडेतोड उत्तर दिले आहे.

34 वर्षीय श्रिया म्हणाली, ‘नाही, मी दत्तक नाही. माझ्या आई-वडिलांनी मला दत्तक घेतल्याच्या बातम्या अचानक येत होत्या, हे पूर्णपणे खोटे आहे. आणि हे असे काही नाही ज्याचे मला समर्थन करणे आवश्यक आहे, कारण मी माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी इंस्टाग्रामवर जन्म प्रमाणपत्र दाखवणार नाही.’

श्रिया पिळगावकरने (Shriya Pilgaonkar) 2013 मध्ये ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात तिचे वडील सचिनही दिसले होते. मराठी आणि फ्रेंच प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर श्रियाने 2016 मध्ये शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये ‘मिर्झापूर’ या मालिकेत ‘स्वीटी’ची भूमिका साकारून श्रियाने ओळख मिळवली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच