नाना पटोले यांच्या विरोधात कॉंग्रेसमध्ये असंतोष; तब्बल २४ दिग्गज नेत्यांनी केली पटोलेंना पदावरुन हटवण्याची मागणी 

Maharashtra Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरु आहे. यातच आता अध्यक्षपदावरुन नाना पटोलेंना (Nana Patole) हटवा आणि शिवाजीराव मोघेंना (Shivajirao Moghe) अध्यक्ष करा, अशी मागणी मोघे समर्थकांनी केली आहे.

एकदोन नव्हे तर विदर्भातील तब्बल 24 नेत्यांनी नाना पटोलेंना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. नाना पटोलेंनी प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी आणली, पक्षात दलित-मुस्लिम आणि आदिवासी यांना दूर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळं पुढचा प्रदेशाध्यक्ष आदिवासी समाजातून करावा, अशी मागणी पक्षाचे निरिक्षक रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांच्याकडे करण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षात गटबाजी निर्माण केली आहे. नाना पटोले यांच्यामुळेचं काँग्रेसची मुख्य व्होटबॅंक असलेले दलित, मुस्लीम आणि आदिवासी यांना पक्षात दूर करण्यात आले आहे. नाना पटोले हे पक्षात मनमानी करत आहेत. आता काँग्रेसमध्ये देखील नानागिरी सुरू असल्याचा दावा शिवाजीराव मोघेंच्या समर्थकांनी केला आहे.