नवाब मलिकांचे कुटुंबीय वारंवार समन्स देऊनही चौकशीसाठी हजर होईनात 

Mumbai – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या (Daud) मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या (financial malpractice) आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांच्या कुटुंबाच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने (ED) चार्जशीटमध्ये चौकशीसाठी नवाब मलिक यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांना समन्स बजावूनही हजर राहिले नसल्याची माहिती दिली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणीच ईडीने हे समन्स बजावलं होतं.

नवाब मलिकांच्या प्रकरणात ईडी कडून त्यांच्या पत्नीला 5 वेळेस आणि मुलाला 2 वेळेस समन्स पाठवण्यात आले होते. पण ते चौकशीसाठी आले नसल्याचे चार्जशीटमध्ये सांगण्यात आले आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासोबत असलेल्या संबधांबाबत आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचे झाले नाही.
मलिक यांच्या पत्नी मेहजबीन मलिक यांना दोनदा समन्स (Summons) बजावले होते, मात्र त्या तपासासाठी हजर झाल्या नाहीत. फराज मलिक (नवाब मलिकाचा मुलगा) याला 5 वेळा समन्स बजावण्यात आले होते, मात्र तो तपासात हजर झाला नाही. अमीर मलिक (मुलगा) याला तीनदा समन्स पाठवले गेले मात्र तोही चौकशीसाठी हजर झाला नाही, अशी माहिती ईडीनं आरोपपत्रात दिली आहे.