Rana JagjitSingh Patil | खोटा प्रचार करण्यापेक्षा आरोपाचे पुरावे द्या, राणा जगजितसिंंहांचे ओमराजे निंबाळकरांना आवाहन

Rana JagjitSingh Patil | खोटा प्रचार करून विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल केली जात आहे.  यापेक्षा केलेल्या आरोपाचे पुरावे द्या, आणि मग बोला, असे खुले आव्हान भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी पारंपारिक विरोधक असलेल्या ओमाराजे निंबाळकर यांना दिले आहे. तसेच धाराशिवसाठी तुम्ही काय केले? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुती कडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे उभे आहेत. प्रचारादरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्याकडून राणा जगजितसिंह पाटील (Rana JagjitSingh Patil) यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. यावर उत्तर देताना ते माध्यमांशी बोलत होते.

तेरणा ट्रस्टकडून नागरिकांवर मोफत उपचार केले जात नाही, या ओमाराजराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर देताना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, तेरणामध्ये एक लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार झालेले आहेत. त्यातील  27 हाजाराच्या आसपास उपचार हे निकषात बसल्यामुळे महात्मा फुले योजने अंतर्गत केले गेले आहेत. तर तोरणा ट्रस्टच्या खर्चातून 48 कोटी रुपये खर्च करून उर्वरीत उपचार झालेले आहेत. मात्र विरोधक कोणताही पुरावा न देता खोटे आरोप  करीत आहेत. त्याच्या विरोधात आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली आहे.

राणाजगजीत सिंग पाटील यांनी धाराशिवच्यावाट्याच मेडिकल कॉलेज हे नेरूळला नेल; या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव हा मुंबईसाठीचाच होता कारण ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची उपलब्धता तेवढी नसते मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी शब्द फिरवून त्याचे चुकीचे समज प्रचारात पसरवले आहेत. म्हणूनच मी त्याला खोटारडा म्हणतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच